परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी सज्ज असावे : जिल्हाधिकारी कुंभेजकर

10 Nov 2025 18:39:26
वाशीम, 
district-collector-kumbhejkar महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २३ नोव्हेंबर रोजी होणार असून या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी वाशीम जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परीक्षा आयोजन सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली.
 
 
district-collector-kumbhejkar
 
या बैठकीत परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी करण्यात आलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे, योजना शिक्षणाधिकारी श्रीकांत भूसारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, पोलिस अधीक्षक यांचे प्रतिनिधी व उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यनगुलवार तसेच डायट प्राचार्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाशीम जिल्ह्यात पहिल्या पेपरसाठी ३,६६९ आणि दुसर्‍या पेपरसाठी ४,६०१ परीक्षार्थी बसणार आहेत. district-collector-kumbhejkar परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार असून, पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायं. ५ या वेळेत घेण्यात येईल. पहिल्या पेपरसाठी १५ परीक्षा केंद्रे आणि दुसर्‍या पेपरसाठी २२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे, फेस रिडिंग व मेटल डिटेशन सुविधा उपलब्ध असून, परीक्षार्थ्यांनी केंद्रावर किमान दीड तास आधी उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
 
 
प्रत्येक झोनसाठी १ झोनल ऑफिसर, १ व्हिडिओग्राफर आणि १ बंदुकधारी पोलिस नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व केंद्रसंचालक, सहाय्यक परिरक्षक आणि झोनल अधिकारी यांच्या नियुत्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केल्या आहेत. district-collector-kumbhejkar परीक्षेचे संपूर्ण सनियंत्रण प्राथमिक शिक्षणाधिकारी (जि.प. वाशीम) जिल्हा नियंत्रक म्हणून, तर माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा सहनियंत्रक म्हणून पाहणार आहेत. परीक्षेपूर्वी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व अधिकार्‍यांची मार्गदर्शनपर सभा आयोजित केली जाणार आहे. परीक्षा साहित्याचे वितरण सर्व केंद्रसंचालकांना करण्यात येणार असून जिल्हा नियंत्रण कक्षाने सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या आढावा बैठकीस जिल्हा सनियंत्रण समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0