आष्टीत जनजाती गौरव यात्रा प्रारंभ

10 Nov 2025 21:39:09
तळेगाव (श्या.पंत), 
janjati gaurav yatra स्व. दत्तोपंत ठेंगडी बहुउद्देशीय संस्था, आष्टी तसेच भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती यांच्या संयुत वतीने भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव यात्रा आष्टी येथे काढण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते होते तर तालुका अध्यक्ष सचिन होले, मनीष ठोंबरे, सुरेश नागपुरे, अभाविपचे जिज्ञासा प्रमुख विवेक धोंगडी, यात्रा संयोजक अक्षय राजूरकर, तालुका संयोजक गंगाधर मडावी, अनिरुद्ध दंडाळे, आशिष खोपे, निरज भार्गव, बाबाराव धुर्वे, रामाजी मरस्कोल्हे, आदींसह जनजाती समाजाचे स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

gaurav yatra 
 
 
यात्रेदरम्यान पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, लेझीम, पारंपरिक नृत्य आणि आकर्षक झांकींच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. यात्रा नगर पंचायत चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, बसस्थानक मार्गे फिरून कार्यक्रमस्थळी समारोप झाला.
प्रसंगी विविध मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या समाजजागृती व स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण करून दिली. जनजाती गौरव यात्रा सुजातपूर, सिरकुटण, ममदापूर, तळेगाव आदी गावांमध्ये कलश पूजनासह जनजाती गौरव यात्रेचे उद्देश सांगण्यात येतील. संपूर्ण वर्धा जिल्ह्यात भ्रमण करून या यात्रेचा समारोप व जनजाती गौरव संमेलन १५ नोव्हेंबर रोजी आष्टी येथे होणार आहे.janjati gaurav yatra या प्रसंगी पालकमंत्री पंकज भोयर, आ. सुमित वानखेडे, वनवासी कल्याण आश्रमचे अनिल मरसकोल्हे, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित राहणार असुन अध्यक्षस्थानी माजी पोलिस आयुत बाबासाहेब कंगाले राहतील. यावेळी मकरंद देशमुख, माजी खासदार अशोक नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, अ.भा.वि.प. विदर्भ प्रांत सचिव पायल किन्नाके, शंकर आत्राम, आदी उपस्थित राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0