तरूणीने कारची खिडकी उघडत स्वतःचे कपडे काढणे सुरू केले आणि...

10 Nov 2025 11:05:51
लखनऊ,
Lucknow tax video लखनऊच्या शहीद पथावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या कारच्या खिडकीतून तरूणी बाहेर आली आणि सार्वजनिक ठिकाणी कपडे काढण्यास सुरुवात केली. या प्रसंगाचे व्हिडिओ रस्त्यावरून जाणाऱ्यांनी शूट केले आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल केला. सध्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून तीव्र टीका होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की शहीद पथावरून कार वेगाने जात आहे, तर तरूणीने कारची खिडकी उघडली आणि बाहेर येऊन कपडे काढणे सुरू केले. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून, कारमध्ये उपस्थित इतर लोक आणि तरूणीबाबत माहिती गोळा केली जात आहे.

Lucknow tax video
 
पोलीस इन्स्पेक्टर सुशांत गोल्फ सिटी उपेंद्र सिंह यांनी सांगितले की, कारचा नंबर गाझियाबादचा आहे आणि त्याच्या आधारे कार आणि प्रवाशांचा शोध सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ही घटना अत्यंत गंभीर असून, आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. याआधीही शहीद पथावर रील बनवण्याचे आणि अश्लील स्टंट करण्याचे प्रकार समोर आलेले आहेत, ज्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
Powered By Sangraha 9.0