वाघाच्या हल्ल्यात व्यक्ती ठार

10 Nov 2025 15:45:34
ब्रम्हपुरी, 
tiger-attack-in-brahmapuri जंगल परिसरात शिंदी आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मेंडकी गावाजवळी जवराबोडी मेंढा जंगल परिसरातील शेतशिवारात घडली. भास्कर गोविंदा गजभिये (55, रा. मेंडकी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 
 
tiger-attack-in-brahmapuri
 
तालुक्यातील मेंडकी येथील रहिवाशी भास्कर गजभिये हे रविवारी धान बांधणीसाठी शिंदी आण्यासाठी गावाजवळी जवराबोडी मेंढा जंगलालगत असलेल्या खाजगी शेतामध्ये गेले होते. यावेळी वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले. बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने कुटुंबिय व गावकर्‍यांनी त्यांचा शोध घेतला. घटनेची माहिती कळताच उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र अधिकारी नरड व अधिनिस्त कर्मचार्‍यांनी घटनास्थही पोहचून चौकशी केली असता भास्कऱ गजभिये यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याने स्पष्ट झाले.
सध्या धान कापणी व जमा करण्याचा हंगाम तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  tiger-attack-in-brahmapuri अशावेळी या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांच्यात दहशत पसरली आहे वनविभागाने वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. .
Powered By Sangraha 9.0