पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्राची ‘नो एन्ट्री’

10 Nov 2025 21:22:50
वर्धा,
nomination papers जिल्ह्यातील सहा नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणुकीकरिता आज १० रोजीपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासह स्वीकरण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना आपले नामनिर्देशन ऑनलाईन पद्धतीने सादर करून प्रिंट निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करावयाची आहे. नामनिर्देशनाच्या पहिल्या दिवशी एकाही नगरपालिकेत एकाही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज सादर केला नाही. एकूणच पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्राची ऑनलाईन एकही एन्ट्री झाली नाही.
 
 

nominee 
 
 
जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षाचीही थेट निवड करणार आहे. जिल्ह्यात सहा नगरपालिका मिळून नगरसेवकपदाच्या एकूण १६६ जागा आहेत. त्यात वर्धा नगरपालिकेत ४०, हिंगणघाट नगरपालिकेत ४०, आर्वी नगरपालिकेत २५, पुलगाव नगरपालिकेत २१, देवळी नगरपालिकेत २० तर सिंदी (रेल्वे) नगरपालिकेत २० जागा आहेत. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. आज सोमवार १० रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्यानंतर प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक होऊ घातलेल्या सहाही नगरपालिकेत एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन सादर केले नाही.nomination papers तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने विविध माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केल्याचे बघावयास मिळाले.
संकेतस्थळावरील तक्रारी नाहीच
निवडणूक लढू इच्छिणार्‍यांना ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज सादर केल्यावर अर्जाची प्रिंट निवडणूक निर्णय अधिका-यांना सादर करणे क्रमप्राप्त आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळाविषयी तक्रारी आल्या काय याची विचारणा अधिकार्‍यांना केली असता कुठलीही तक्रार पहिल्या दिवशी प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0