शिरपूर जैन,
education-commissioners-office माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्या मागील काही वर्षापासून प्रलंबित आहेत. न्यायालयीन आदेशानुसार सुरू करण्यात आलेली शिक्षकेतर कर्मचार्यांची पदभरती शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढून बंद केली आहे. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
माध्यमिक शिक्षकेतर कर्मचार्यांची पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी यासह चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना २४ वर्षानंतर मिळणार्या लाभानुसार त्यांची वेतन निश्चिती पे मॅट्रिस ड - ४ मध्ये न करता पूर्वीप्रमाणे ड - ५ मध्येच करण्यात यावी. माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचार्यांना राज्य शासकीय कर्मचार्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०- २०-३० वर्षानंतरचा लाभ तात्काळ लागू करण्यात यावा. माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतन श्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती देण्यात यावी. education-commissioners-office माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्यांना देण्यात आलेला २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचार्याप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावा. माध्यमिक शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने न करता पूर्वीप्रमाणे नियमित वेतन श्रेणीत करण्यात यावी. माध्यमिक शाळातील वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल अतिरिक्त झाल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत वेतनास व वेतन श्रेणी संरक्षण मिळावे. शिक्षकेतर कर्मचार्यांच्या लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक ग्रंथपाल शिपाई यांच्या वेतनातील त्रुटी तात्काळ दूर करण्यात याव्यात. शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जित रजा साठवण्याची मर्यादा काढून टाकण्यात यावी आदी मागण्यासाठी शिक्षकेतर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वात १७ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये शिक्षकेतर कर्मचार्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सरकार्यवाह शिवाजी खांडेकर,कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, वाशीम जिल्हा अध्यक्ष कैलास ढवळे, सचिव रामराव कायंदे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल काळे, उपाध्यक्ष आनंद पेंटे, जयंत सरनाईक, महादेव धूळधुळे तसेच इतर पदाधिकारी निलेश मस्के, अमोल मोहळे, कैलास बोरचाटे, गजानन इंगोले, संजय लहाने, मनोज चाकोलकर, दत्तात्रय गारुळे, स्मिता इंझाळकर प्रसिद्धी प्रमुख ओंकार गिरी आदींनी केले आहे.