वर्धा,
sand ghats auctioned प्रयत्ने वाळूतून तेलही गळे अशी एक म्हण आहे. जिल्ह्यात ४२ रेती घाटांचा लिलाव होणार आहे. त्यातून रेतीतून ८.१३ कोटींचा महसुलही मिळणार आहे. परंतु, वर्षही भर जे वाळू उत्खनन झाले त्याचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. वाळू घाटांचे लिलाव म्हणजे अवैध वाळूला जोर पकडण्यासारखे आहे. नागरिकांना रास्त दरात रेती मिळावी तसेच रेती चोरीसह रेतीच्या अवैध वाहतुकीला ब्रेक लागावा याहेतूने गेल्या वेळी शासनाने रेती डेपोतून रेतीची विक्री हे धोरण स्वीकारले होते. पण याच धोरणाची अंमलबजावणी करताना रेती डेपोत रेती कमी अन् रेती माफियांच्या घशात जादा असाच प्रकार जिल्ह्यात झाला. त्यानंतर रेती डेपोतून रेतीची विक्री या धोरणाला शासनाने बाजूला सारत पुर्वी प्रमाणेच रेती घाटांचा लिलाव करण्याचे निश्चित केले.
संबंधित धोरण निश्चित झाल्यावर खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील किती रेती घाटांचा लिलाव करू शकतो याबाबतची इत्यंभूत माहिती घेतली. शिवाय ४२ रेती घाटांचा लिलाव करण्याच्या अनुषंगाने पर्यावरण विभागास अनुमती मागितली. वर्धा जिल्ह्यातील ४२ रेती घाटांच्या लिलावाच्या विषयावर पहिले ऑटोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य पर्यावरण तज्ज्ञ मुल्यांकन समिती (एसईएसी) तर नंतर महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरण (एसईआयएए)च्या बैठकीत चर्चा होत हिरवीझेंडी देण्यात आली. पर्यावरण विभागाची अनुमती मिळताच जिल्हा प्रशासनाच्या खनिकर्म विभागाने संबंधित ४२ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे. याच ४२ रेतीघाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला किमान ८ कोटी १३ लाख ९७ हजार २०० रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात आले.sand ghats auctioned रेती घाटांचा लिलाव न झाल्याने चोरीच्या रेतीची चढ्या दराने विक्री करण्याचा सपाटाच काही भुरट्या तर काही वाईट कॉलर माफियांकडून लावण्यात आला असल्याचे चित्र बघावयास मिळते. जिल्ह्यातील ४२ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रेती चोरीच्या प्रकारासह शासनाच्या बुडणार्या महसुलाला बर्यापैकी ब्रेक लागणार आहे. शिवाय वाजवी दरात नागरिकांना घर, व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या बांधकामासाठी रेतीही उपलब्ध होणार आहे.
१ लाख ५० हजार ब्रास रेतीचा होणार लिलाव
जिल्ह्यातील ४२ रेती घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सध्या जिल्हा खनिकर्म विभागाकडून राबविली जात आहे. या ४२ रेती घाटांमधील तब्बल १ लाख ५० हजार ७४० ब्रॉस रेतीचा लिलाव होणार आहे.
सर्वाधिक घाट हिंगणघाट उपविभागातील
लिलाव होत असलेल्या ४२ रेतीघाटांमध्ये सर्वाधिक रेतीघाट हिंगणघाट उपविभागातील आहे. आर्वी उपविभागातील १०, वर्धा उपविभागातील ११ तर हिंगणघाट उपविभागातील तब्बल २१ रेती घाटांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.