निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाचे पथसंचलन

10 Nov 2025 18:43:05
मंगरूळनाथ,
police-department-roadshow निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता,सार्वजनिक सुरक्षितता राखणे, नागरिकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करणे व कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी मंगरुळनाथ पोलिस विभागाचे वतीने शहरातू ८ नोव्हेंबर रोजी पथसंचालन काढण्यात आले.
 
 
police-department-roadshow
 
सर्वप्रथम मंगरूळनाथ पोलिस स्टेशनच्या आवारात उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात दंगा काबू तालीम घेण्यात आली. त्यासाठी पोलिस निरीक्षक किशोर शेळके व २० अंमलदार, आसेगाव व जऊळका प्रत्येकी ५ अंमलदार, अनसिंग येथील ८ अंमलदार व उपविभातील सर्वं पोलिस निरीक्षक व ५ दुय्यम अधिकारी तसेच आरसीपी पथक हजर होते. तालीम नंतर मंगरूळनाथ शहरात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथसंचलन काढण्यात आले. police-department-roadshow सदर पथसंंचालन वीर भगतसिंग चौक, श्री संत बिरबलनाथ मंदिर चौक, सुभाष चौक येथून पोलिस स्टेशन पर्यंत आले. पथसंंचालनामध्ये वाशीम जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0