राकाँ (शप) गटाकडे इच्छूकांचा वाढता कल; ३१० अर्ज दाखल

10 Nov 2025 21:39:20
वर्धा,
Sharad Pawar group नगरपालिका निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर राकाँ शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ३१० इच्छुकांनी अर्ज पक्षाकडे दाखल केले आहे.
 

Sharad Pawar group 
अनेक ठिकाणी नव्या चेहर्‍यांनी राजकारणात पदार्पण करण्याची तयारी दाखवली असून अनुभवी माजी नगरसेवक आणि समाजसेवकानी देखील पुन्हा मैदानात उतरण्याची इच्छा व्यत केली आहे. त्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया पक्षासाठी उत्साहवर्धक आणि स्पर्धात्मक ठरणार आहे असे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले. प्राप्त अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार असून जनतेच्या हितासाठी काम करणारे, स्वच्छ प्रतिमा असलेले आणि विकासाभीमुख विचारसरणीचे उमेदवार निवडण्यात येतील. उमेदवार निवडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व आणि जिल्हा पातळीवरील समन्वय समितीच्या बैठकीनंतर घेण्यात येईल.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले म्हणाले जनतेच्या विकासाचा विचार, स्वच्छ प्रशासन आणि प्रामाणिक सेवा या निकषांवर उमेदवार निश्चित केले जातील. नागरिकांमध्ये पक्षाबद्दलचा विेश्वास वाढला असल्याचे वांदिले यांनी कळवले आहे.
Powered By Sangraha 9.0