salary-determination-of-retired-teacher जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षकांनी वरिष्ठ व एकस्तर वेतन निश्चिती करून लाखो रुपयांची उचल केल्याचा प्रकार तत्कालीन गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी उघडकीस आणून या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना तक्रार केली होती. संबंधित शिक्षकांनी वेतन निश्चिती चुकीची केली असल्याचे त्यांच्या सेवा पुस्तकाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित शिक्षकांकडून अतिरिक्त रकमेचा परतावा एकरकमी घेण्याचे आदेश काढले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत राहतो. आता अर्जुनी मोर पंचायत समिती अंतर्गत 17 सेवानिवृत्त शिक्षकांची वरिष्ठ व एकस्तर वेतन निश्चितीचा प्रकार चांगलाच गाजत आहे. salary-determination-of-retired-teacher हा प्रकार उघड करणार्या व त्या शिक्षकांची वेतन निश्चिती रद्द करणार्या तत्कालीन अर्जुनी मोरचे गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे शिक्षक व त्यांच्या काही संघटनांनी तक्रार केली होती. तक्ररीनंतर सीईओंनी चव्हाण यांना कारणे द्या नोटीसही बजावली होती. मात्र शिक्षकांचे मुळ सेवापुस्तकांची तपासणी करण्यात आली असता एकस्तर वेतनश्रेणी ही चटोपाध्याय वेतननिश्चितीच्या वेतनवाढीवर केली असल्याने देय नसल्याने त्या 17 शिक्षकांची केलेली वेतन निश्चिती व पडताळणी ही चुकीची असुन त्यावर रद्द हा शेरा नोंदविण्यात आलेला आहे, तो बरोबर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांची केलेली वेतन निश्चिती व पडताळणी चुकीची असल्याने त्यांना एकस्तर वेतनश्रेणीची थकबाकी देय नसल्याने एकस्तर वेतनश्रेणीची थकबाकी त्यांचेकडुन एकमुस्त एकरक्कमी वसूल करण्याचे आदेश सीईओंनी दिले असून तसा अहवाल सादर करण्याचे बजावले आहे. एकस्तर वेतन निश्चिती प्रकरणाची सर्वकष चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून आता पुढे येत आहे.