डोनाळा जंगल परिसरात वाघ व वाघिण जेरबंद

10 Nov 2025 18:51:10
सावली, 
donala-forest-area सावली वनपरिक्षेत्रातील उपवन व्याहाड (खुर्द) कार्यक्षेत्रातील उपरी वनबिटात येणार्‍या डोनाळा जंगल परिसरात गेल्या काही दिवसापासून वाघ व बिबट्याची मोठी दहशत आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने कक्ष क्रमांक 198 मध्ये 9 नोव्हेंबर रोजी पिंजरे लावले होते. त्यात रात्रीच्या सुमारास एक वाघिण व एक वाघ जेरबंद झाला असून, अन्य वाघांना पकडण्यासाठी वनकर्मचार्‍याची गस्त वाढविण्यात आली आहे.
 
 
donala-forest-area
 
सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रात 7000 हेक्टर एवढे विस्तर्ण जंगल असून, या जंगलालगत मोखाडा, व्याहाड (खुर्द), केरोडा, कोंडेखल, जांब, रयतवारी, सिर्सी, साखरी, लोंढोली, उमरी, हरांबा, कढोली, डोनाळा, उपरी, कापसी, पेठगाव, भांसी, सोनापूर, सामदा, व्याहाड बुज., वाघोली आदी गावे वसली आहेत. या गावातील अनेकांची शेती याच जंगलाला लागून असल्याने वाघ व बिबट्याच्या दहशतीत नागरिकांना जिव मुठीत धरून शेतीची काम करावी लागते. तर गावातील गुरेढोरे व शेळ्या चराईसाठी याच जंगलात न्यावे लागते. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण आहे. donala-forest-area मोठ्या प्रमाणात वाघाचा संचार असलेल्या या जंगलात अनेकांचे गुरे शेळ्या वाघाने फस्त केल्या असून, गुराख्यावरील हल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महिना भरापूर्वी चक पेठगाव येथील गाववासियांनी वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरली होती. नागरिकांची ही गंभीर समस्या लक्षात घेऊन वनविभागाने या वनपरिसरात वनकर्मचार्‍याची गस्त लावून, संपूर्ण जंगल परिसरात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावले. ज्या ठिकाणी वाघांची नेहमी वर्दळ असते अशा ठिकाणी पिंजर्‍याची व्यवस्था केली. त्यामुळे नेहमीच वाघांचा संचार असलेल्या उपरी-कढोली मार्गावरील डोनाळा गावालगतच्या कक्ष क्रमांक 198 मध्ये असलेल्या पिंजर्‍यात रविवारी रात्रीच्या सुमारास एक वाघिण व एक वाघ जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे. उर्वरित वाघांना पकडण्यासाठी 40 ते 50 वनकर्मचार्‍याची गस्त लावण्यात आली असून ‘शॉर्टशूटर‘ही त्याकामी लागले आहेत .
Powered By Sangraha 9.0