नागपूर,
Pandurangeshwar mandir दिनदयालनगरमधील पांडुरंगेश्वर शिव मंदिरात वैकुंठ चतुर्दशीच्या मुहूर्तावर तुळशी विवाह पारंपरिक उत्साहात संपन्न झाला. तुळशीच्या झाडाला अलंकृत करून सजविण्यात आले, तर भगवान कृष्णालाही नवे वस्त्र परिधान करून शोभा वाढवली. मंगलाष्टकांच्या गजरात हा विवाह विधी पार पडला.
परिसरातील मोठ्या संख्येने महिला-पुरुष उपस्थित होते. विवाहानंतर पेढे आणि इतर प्रसाद वाटण्यात आले. याच दिवशी कार्तिकी पौर्णिमेचा शेवटचा दिवस होता. Pandurangeshwar mandir रात्री बारा वाजता त्रिपूर जाळून दुष्ट प्रवृत्तींचा नाश केला जातो. भगवान शिवशंकराने या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला होता. मंदिरात भजन-पूजन करून त्रिपूर जाळले गेले आणि दुष्ट शक्तींचा नाश करण्यात आला.
सौजन्य: वर्षा देशपांडे, संपर्क मित्र