काशीपूर,
wife-raped-in-hotel-for-dowry उत्तराखंडच्या काशीपूर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेनने आपल्या नवऱ्यावर हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा आणि त्याचा अश्लील व्हिडिओ तयार करण्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच पतीने ५० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी सुरू केली आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.
महिलेने सांगितले की तिचे लग्न १२ फेब्रुवारी २०२३ रोजी बिलासपूर (रामपूर) येथील युवकासोबत झाले. तिचा नवरा लोकांना परदेशात पाठविण्याचे काम करत होता. लग्नानंतर त्याने तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले आणि सतत पैशांची मागणी सुरू ठेवली. अखेर त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. wife-raped-in-hotel-for-dowryपोलिसांनी पतीसह इतर आरोपींविरुद्ध हुंडाबळी, धमकी आणि लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, आणखी एका घटनेत रुद्रपूर येथे संशयास्पद परिस्थितीत कोलकात्याच्या एका महिलेचा मृतदेह फाशीच्या स्थितीत आढळला. ती महिला काही महिन्यांपासून रुद्रपूरमध्ये राहत होती आणि सिडकुल औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करत होती. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या एका मित्राला फोन करून आपले जीवन संपवण्याबद्दल सांगितले होते. wife-raped-in-hotel-for-dowry पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक महिला २७ वर्षीय सुचित्रा दास, रहिवासी गगनापूर, नदिया (कोलकाता, पश्चिम बंगाल), काही काळापासून तिच्या काका शिवकुमार मल्लिक यांच्यासोबत रुद्रपूरमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिने फुलसुंगा ट्रांझिट कॅम्प येथे भाड्याने खोली घेतली होती. रविवारी सकाळी ती साडीच्या फासाने लटकलेल्या अवस्थेत आढळली. शेजाऱ्यांनी तिला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.