पुलगाव,
Construction workers clash गेल्या काही महिन्यांपासून कामगारांचे नूतनीकरण व नवीन नोंदणीचे अर्ज तसेच अनुदानाचे अर्ज विनाकारण अपात्र करण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांना शासनाकडून मिळणार्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, बांधकाम कामगारांनी जिल्हा कामगार कार्यालयावर धडक देत या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन कामगार अधिकार्यांना देण्यात आले आहे.
कामगार मंडळाने बांधकाम कामगारांकरिता हे मंडळ स्थापन केले असून त्याचा लाभ येथील कर्मचारी तसेच काही संघटना घेत असल्याचे स्थानिक कामगारांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कामगारांना न्याय देण्यात यावा, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कामगार अधिकारी सीमा शिंदे यांच्या वतीने मनीष सुभेदार यांनी स्विकारले. सदर निवेदन सेवाशती बांधकाम कामगार संघटनेचे सचिव सुनील उपासे यांच्या नेतृत्त्वात मिलींद ब्राह्मणकर, नितीन डफरे, शरद वरकड, विजय गावंडे, धनराज ढोणे, रवी हिवरे, सुधाकर बिजवे, शालिक मुंगभाते, दीपक खरडे, दर्शना लुंगे, दीपिका गौतम, देविदास आसोले, दुर्गा डुकरे, सुनीता आत्राम आदी उपस्थित होते.