सिंदी (रेल्वे),
Cotton in the Selu sub-market सेलू उपबाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस खरेदीचा शुभारंभ आज बुधवार १३ रोजी करण्यात आला. समिती सदस्य रेणुका कोटंबकर, काशीनाथ लोणकर व उद्योजक वरुण दफ्तरी यांच्या हस्ते लिलावास सुरूवात झाली. यावेळी समितीचे मुख्याधिकारी तथा सचिव महेंद्र भांडारकर, कापूस व्यापारी एस. आर. जिनिंग, गिरीराज कॉटेस, गोल्ड फायबर, दत्त उद्योग, साई व्हाईट गोल्ड आणि मे. एस. एल. आर. जिनिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कापूस लिलावात १३ वाहनं कापूस आणण्यात आला होता. व्यापार्यांनी सरासरी ७ हजार ०५० रुपये प्रतिविंटल दर निश्चित केला होता. मात्र, सदस्यांच्या विनंतीचा मान राखत सरासरी ७ हजार १०० रुपये प्रतिविंटल भाव देण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शेतकर्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. परिसरातील शेतकरी, वाहनचालक उपस्थित होते. शेतकर्यांनी कापसाची विक्री करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सेलू उपबाजारपेठेच्या आवारात यावे, असे आवाहन सभापती केसरीचंद खंगारे यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी महेंद्र भांडारकर यांनी सांगितले की, सीसीआयची खरेदी मंगळवार १८ रोजीपासून सुरू होणार आहे. खरेदीसाठी कापसाची आर्द्रता १२ ते १३ टयांपर्यंत असावी. शेतकर्यांनी विक्रीसाठी समिती कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी. प्रक्रियेत प्रथम नोंदणी, त्यानंतर अप्रूव्हल व स्लॉट बुकिंग करून विक्री करण्यात येईल, असही त्यांनी सांगितले.