श्री पांडुरंगेश्वरात रामकथा

12 Nov 2025 18:39:57
नागपूर,
 Deendayal Nagar Nagpur दीनदयालनगर येथील श्रीपांडुरंगेश्वर शिव मंदिरात ५ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या संगीतमय रामकथेची मंगल सांगता मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी भक्तिभावात पार पडली.
 
vank
 
या रामकथेदरम्यान कथाकार श्री संपुर्णनंद यांनी वनवासी रामरायाच्या जीवनातील केवट भेट, शबरी प्रसंग, सुग्रीव मिलन, मुद्रिका प्रकरण,  Deendayal Nagar Nagpur हनुमंताचे सागरलांघन आणि सीता माता भेट अशा अनेक भावस्पर्शी प्रसंगांवर प्रकाश टाकत भक्तांची मने जिंकली.या प्रसंगी मंदिर व्यवस्थापन समिती, पंचकमिटी व समुत्कर्ष संस्था यांच्या वतीने कथाकार परिवाराचा सत्कार करण्यात आला. ग्रंथ पूजनाचा मान सचिव दीपक पथे, कोषाध्यक्ष मुरलीधर कुहेकर, राजेंद्र कोहळे, तुषार कवीश्वर आणि राजीव भूत यांनी स्वीकारले होते.
 
सौजन्य:विकास देशपांडे,संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0