मुंबई
Dharmendra health improves बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना आरोग्य बिघडल्याने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १० नोव्हेंबर रोजी त्यांना वेंटिलेटरवर हलवण्यात आले होते, परंतु आता त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधार झाला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या कुटुंबाने त्यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातून एम्ब्युलन्सद्वारे त्यांना त्यांच्या निवासस्थानी हलवण्यात आले. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांना एम्ब्युलन्समधून घरी आणताना दिसत आहे. त्यांच्या चाहत्यांनी ही बातमी ऐकताच सुटकेचा निश्वास सोडला असून सर्वत्र त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.अभिनेता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत त्यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी तसेच मुलगी ईशा देओल यांनी स्वतः माहिती दिली होती. ११ नोव्हेंबर रोजी ईशाने सोशल मीडियावर लिहिले होते, "माझ्या पप्पांची तब्येत स्थिर आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा."
धर्मेंद्र गेल्या १२ Dharmendra health improves दिवसांपासून आजारी होते. १ नोव्हेंबर रोजी त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची खबर घेण्यासाठी शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांसह अनेक बॉलिवूड कलाकार रुग्णालयात पोहोचले होते. दरम्यान, काही सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या निधनाच्या अफवा पसरल्यानंतर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी त्या अफवांना फेटाळत स्पष्ट केले की धर्मेंद्र सुरक्षित आहेत आणि त्यांचे उपचार सुरू आहेत.धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधार झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वजण त्यांच्या पूर्ण आरोग्यलाभासाठी शुभेच्छा व्यक्त करत आहेत.