....तर जडेजाच नाही, धोनीही सीएसके सोडणार!

12 Nov 2025 17:19:20
मुंबई,
Dhoni will also leave CSK आयपीएल IPL 2026 च्या ऑक्शनच्या काऊंटडाऊनसह क्रिकेट विश्वात चेन्नई सुपर किंग्सची टीम सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या सिझनमध्ये शेवटच्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेला मोठ्या बदलाची गरज असल्याचे स्पष्ट होत असून, टीम एका मॅचविनर खेळाडूच्या शोधात आहे. सध्या सीएसके आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांच्यातील संभाव्य ट्रेड डीलमुळे चर्चेला उधाण आले आहे. भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने या ट्रेडवर धक्कादायक दावे केले आहेत. त्यानुसार, जर हा डील यशस्वी झाला आणि संजू सीएसकेमध्ये स्थिरावला, तर माही धोनी आयपीएल 2026 च्या आगामी सीझनमध्ये अर्ध्यातच टीम सोडून संजूला कॅप्टन्सी देऊ शकतो.
 
 

Dhoni will also leave CSK 
 
संजू सॅमसन, आरआरचा कॅप्टन आहे, सीएसकेमध्ये येण्यासाठी सज्ज आहे. या बदल्यात जडेजा आणि आणखी एका प्लेअरला आरआरमध्ये पाठवण्याची तयारीसीएसकेने दाखवली आहे. दुसऱ्या खेळाडूबाबत अजून अंतिम निर्णय झाला नसला तरी सुरुवातीला सॅम करनचं नाव चर्चा होती, परंतु आता RR श्रीलंकेचा फास्ट बॉलर मथीशा पथिरानाला टीममध्ये घेण्यास उत्सुक आहे, अशी माहिती मिळतेय. मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, धोनी त्याची बुद्धिमत्ता वापरून हा निर्णय घेत आहे. टीमच्या भविष्याचा विचार करून तो जडेजासारख्या मॅच-विनरला सोडायला तयार आहे, कारण संजूमध्ये सीएसकेचा भावी लीडर दिसतोय. कैफने जडेजाच्या IPL 2022 मधील कॅप्टन्सीच्या अपयशाची आठवण करून दिली. त्या वेळी सीएसकेने पहिल्या आठ मॅचेसपैकी फक्त एक जिंकली होती, ज्यामुळे धोनीला पुन्हा टीमचे नेतृत्त्व स्वीकारावे लागले होते.
 
तो पुढे म्हणाला, धोनी आणि जडेजा दोघांनी आपला IPL प्रवास 2008 मध्ये सुरू केला. धोनी सीएसकेमध्ये सुरूवातीपासूनच आहे. पण जर हा ट्रेड यशस्वी झाला, तर हा धोनीचा शेवटचा सीझन असू शकतो आणि कदाचित तो हा सीझन पूर्ण देखील करणार नाही. कैफने स्पष्ट केले की सीएसके दीर्घकाळापासून धोनीच्या जागी योग्य उत्तराधिकारी शोधत आहे. "जडेजाला कॅप्टन्सी मिळाली, परंतु त्यामध्ये तो सहज नव्हता. IPL मध्ये प्रत्येकजण लीड करू शकत नाही. धोनीचा दीर्घकालीन दृष्टिकोन स्पष्ट आहे. तो जडेजाला सोडून भावी कॅप्टनला टीममध्ये आणायला तयार आहे," असं कैफनं सांगितलं. सीएसकेची संपूर्ण योजना धोनीच्या निवृत्तीनंतर टीमचे नेतृत्व कोण करेल यावर आधारित आहे आणि त्यासाठी संजू सॅमसन सर्वात योग्य पर्याय मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0