अमेरिकेकडे बुद्धिमत्तेची कमतरता...डोनाल्ड ट्रम्प यांची कबुली VIDEO

12 Nov 2025 12:08:25
नवी दिल्ली,
Donald Trump's confession अमेरिकेकडे स्वतःची पुरेशी प्रतिभा नाही, म्हणूनच आपल्याला परदेशातून कुशल लोक आणावे लागतील,” असे विधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. आपल्या नेहमीच्या कठोर भूमिकेच्या उलट, ट्रम्प यांनी आता एच-१बी व्हिसाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. अमेरिकन उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राला आघाडीवर ठेवण्यासाठी परदेशी तज्ञांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
 

visa
संग्रहित फोटो 
ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेकडे उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रांसाठी आवश्यक तितके कुशल कामगार नाहीत. आपण परदेशी तज्ञांना हटवतो तेव्हा त्याचा फटका आपल्यालाच बसतो. त्यांनी जॉर्जियातील ह्युंदाई प्लांटवरील आयसीईच्या छाप्याचे उदाहरण देत सांगितले की, अशा कारवाईमुळे अमेरिकेच्या उद्योगांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागले.
एकेकाळी अमेरिका पुन्हा महान बनवा आणि इमिग्रेशन आमच्या नोकऱ्या हिरावून घेत आहे अशा घोषणांसह निवडणुकीत उतरलेले ट्रम्प आता त्या भूमिकेत बदल करताना दिसत आहेत. २०२५ मध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी व्यापार करार, शुल्कवाढ आणि स्थलांतरावर निर्बंध अशा कठोर उपाययोजना केल्या होत्या. मात्र आता त्यांनी मान्य केले आहे की अमेरिकेच्या तांत्रिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी परदेशी प्रतिभेचे स्वागत करणे अपरिहार्य आहे.
ट्रम्प म्हणाले, मी अमेरिकन नागरिकांसाठी उच्च वेतनाचे समर्थन करतो, पण तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील जटिल कामांसाठी आपल्याकडे पुरेशी प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. त्यामुळे आपल्याला जगभरातून कुशल लोकांना आकर्षित करावे लागेल. एच-१बी व्हिसा सुधारणा ही त्यांची प्राधान्यक्रमात आहे का असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी थेट उत्तर देत म्हटले, हो, मी सहमत आहे, पण त्याच वेळी ही प्रतिभा आपल्या देशात आणणे देखील गरजेचे आहे. ट्रम्प यांच्या या नव्या विधानाने त्यांच्या पूर्वीच्या कठोर इमिग्रेशन भूमिकेतील बदल स्पष्ट झाला असून, अमेरिकेच्या तांत्रिक भविष्यासाठी ते आता व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Powered By Sangraha 9.0