नागपूर,
ticketless-passengers : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात व्यापक तिकीट तपास मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध मार्गांवरील २२ गाड्यांमध्ये तिकीट तपास करण्यात आला. विनातिकीट आणि अनियमित प्रवासावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम घेण्यात आली होती. मोहिमेत ८० तिकीट तपास कर्मचारी, ०७ वाणिज्य निरीक्षक, ७ रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी सहभागी झाले होते. तपास मोहिमेदरम्यान १ हजार ५९ विनातिकीट किंवा अनियमित प्रवासाचे प्रकार आढळून आले. या कारवाईतून लाख ८ हजार ५५ रुपयांचा दंड व भाडे वसुलीच्या स्वरूपात प्राप्त झाले. सरासरी प्रत्येक तिकीट तपास कर्मचार्याने १३.२४ प्रकरणांमधून ८,८५०.६९ इतकी वसुली केली.