बीड,
Jaydutt Kshirsagar will join NCP आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. बीडमध्ये चार वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाची शक्यता येत्या आठवडाभरात आहे, असे सांगण्यात येत आहे.
हा निर्णय बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाशी जोडलेले आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर अजित पवार गटाशी, तर तिसरे पुतणे हेमंत क्षीरसागर भाजपाशी संबंधित आहेत. या परिस्थितीमुळे क्षीरसागर कुटुंबामध्ये राजकीय वाटप अधिक स्पष्ट झाले असून बीडमध्ये आता राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागर कुटुंबासाठी बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये ही उलथापालथ अनेक पक्षांसाठी निर्णायक ठरणार आहे.