धक्कादायक... जि.प.शिक्षकाने केला पाच विद्यार्थिनीचा विनयभंग

12 Nov 2025 15:34:55

Molestation of a student 
 
अकोला,
Molestation of a student अकोला-पातूर तालुक्यातील एका गावातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने पाच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली असून मंगळवार,११ रोजी आरोपी शिक्षकाला चान्नी पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. पातूरच्या एका जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सुधाकर जानकिराम पांडे याने सहा दिवसापुर्वी शाळेत शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलीचा वाईट उद्देशाने विनयभंग केला. असे पिडीता ने तिचे सोबत घडलेल्या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितले अल्पवयीन मुलीच्या आईच्या तोंडी तक्रारीहून आरोपी शिक्षकाविरूध्द पोक्सो कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीस अटक करून पुढील तपास ठाणेदार रविंद्र लांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विजय घुगे, सुधाकर करवते हे करित आहेत.शिक्षकावर गुन्हा नोंद झाल्याने प्रशासकीय कारवाईकडे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0