नागपूर,
my-umbrella-planetarium-model : रायपूर येथील एनएच गोयल स्कूलमध्ये नुकत्याच आयोजित झालेल्या पहिल्या नॅशनल टीचर्स कॉन्फरन्स मध्ये नागपूरचे नाव चमकले आहे. या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती दीप्ती चंदनसिंह बिष्ट यांना त्यांच्या ’माय अम्ब्रेला प्लॅनेटेरियम’ या प्रतिकृती साठी पदक प्राप्त झाले आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी या स्पर्धेत बेस्ट फाईव्ह शिक्षकांमध्ये ही स्थान मिळवले आहे.
या परिषदेत देशभरातील राज्यांमधून आलेल्या ४४० शिक्षकांनी भाग घेतला होता. मनपाच्या शिक्षिका श्रीमती दीप्ती बिष्ट यांनी सादर केलेले माय अम्ब्रेला प्लॅनेटेरियम हे खगोलशास्त्राचे मॉडेल विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. या अभिनव मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना आणि नक्षत्रांबद्दल सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. उपस्थित शिक्षकांनी या मॉडेलची प्रशंसा केली. यावेळी दीप्ती बिष्ट म्हणाल्या की, त्यांना ही अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत, पण या पुरस्कारामुळे त्यांना आणखी प्रेरणा मिळाली आहे.