नागपूर,
Nagpur Bhavsar Samaj नागपूर भावसार क्षत्रिय समाजाच्या राज्यस्तरीय 1000 उपवधू–वरांचा परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. नागपूर भावसार समाज आणि AIBKM महासभा-भावसार कल्याणम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीम बाग येथे हा भव्य मेळावा आयोजित केला गेला. या कार्यक्रमाला भावसार समाजाच्या शताब्दी महोत्सवाच्या शुभपर्वावर सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन दक्षिण नागपूरचे आमदार मा. मोहन मते यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये एआयबीके महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गिरीश वायचळ, उपवधूवर विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर शेळके, उपवधूवर राष्ट्रीय सचिव स्मितल फुलकर, भावसार कल्याणम ट्रस्टचे मुख्य संचालक अमोल हिबारे, अभय गुजर आणि संजय पतंगे, नागपूर भावसार क्षत्रिय समाज पंचकमेटी अध्यक्ष राजेंद्र अंबारे, ॲड. सुभाष गोजे, नागपूर शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज गोजे, नागपूर महानगर पालिका माजी नगरसेवक अशोक काटले उपस्थित होते.
या मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगाना अशा विविध राज्यांमधून साधारण 1000 उपवधू–वर आणि त्यांचे पालक, समाजबांधवांसह एकूण 5000 हून अधिक लोकांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन अपर्णा फुटाणे (पुणे), वंदना धोटकर, श्वेता गोजे व सुजाता सरागे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक बोरघरे (कोषाध्यक्ष) यांनी केले.