देशभरात जाळे ! बेराेजगार युवकांचा कारणामा

12 Nov 2025 11:24:43
अनिल कांबळे
नागपूर,
inter-state racket, नाेकरी मिळवून देण्याच्या नावावर किंवा व्यवसायात भागीदारी देण्याच्या नावावर जाळ्यात ओढल्यानंतर त्यांच्या नावावर फर्म्स उघडून बॅंक खात्यांच्या माध्यमातून ऑनलाईन गाेरखधंदा करणाèया आंतरराज्यीय रॅकेटचा पाेलिसांनी छडा लावला आहे. पाेलिसांनी या प्रकरणात 27 पैकी 23 आराेपींना अटक केली आहे. संबंधित फर्म्स व बॅंक खात्यातून ऑनलाईन गेमिंग, बेटिंग, सट्टेबाजी, अवैध सावकारी, हवालाचा व्यवहार सुरू हाेता, अशी माहिती पाेलिस आयुक्त डाॅ.रविंद्रकुमार सिंगल यांनी दिली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
 
 

inter-state racket, 
वैभव नुरसिंग बघेल (27, आर्यनगर, काेराडी), सुमित राजेश पटले (23, नवरगाव, गाेंदिया), राेहित हरीश कांबळे (39, बजरंगनगर, मानेवाडा), साेहेल अब्दुल सलीम खान (38, मानकापूर), अश्विन सत्येंद्रकुमार भार्गव (18, नरसिंगपूर), अनिलकुमार सर्वेश्वर दास (बालेश्वर, मध्यप्रदेश), सुशांत जगबंधु राऊत (कुसनपूर, केंद्रपाडा, मध्यप्रदेश), श्रेयस संजय मस्के (शांतीनगर), पंकज शेखर टेटे (पाचपावली), शेख मैदुल शेख शीउल रहेमान (हरदासपूर, जाजपूर), अझहर शेख सिराज शेख, (पिंपरी चिंचवड, पुणे), पंकज श्रीरामसिंग विष्वकर्मा (विदीशा, मध्यप्रदेश), अक्षय अनिल काजडे (पिंपरी चिंचवड, पुणे), अभिषेक धनराज गुप्ता (ुकटनगर, नागपूर), दिपक ज्ञानचंद्र विश्वकर्मा (भाेपाळ, मध्यप्रदेश), विजय रामचंद्र नराेटे (जेल राेड, नाशिक), सुरजितसिंग महेंद्रसिंग बेदी (दीपकनगर, नागपूर), सागर गाेविंद बागडे (नारी राेड, नागपूर), चंद्रकांत भानुदास शिराेळे (शिंदेगाव, नाशिक), राहुल संजय जुनी (अमरावती), देवेश महेश वजीर (जवाहर गेट, अमरावती), अमर संजयराव वाघाेळकर (नीळकंठ चाैक, अमरावती), आशीष नंदकिशाेर बसेडीया (शांतीनगर, नरसिंगपूर, मध्यप्रदेश) अशी आराेपींची नावे आहेत.
 
 
काय आहे प्रकरण
 
 
नाेकरीच्या शाेधात असणाèया दीपक घनश्याम गायधने (28 ,नागराज चाैक, गाेंदिया) याची आराेपी सुमित पटलेसाेबत भेट झाली. दीपकने सुमितला नाेकरी पाहण्यास सांगितले. सुमित व राेहितने इतर काही आराेपींसाेबत त्याची भेट घेतली. ‘तू व्यवसायातून ना कमवू शकताे,’ असे त्याला म्हणत नाेंदणी व बॅंक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड घेतले. आराेपींनी बॅंक ऑफ बडाेदा, हिंगणा येथे त्याचे बॅंक खाते उघडले. तसेच त्याच्या नावावर दीपक एंटरप्रायजेस या फर्मची सरकारी नाेंदणी केली. त्यांनी दीपकच्या नावावरच सीम कार्ड घेतले व ते तसेच बॅंक खात्याचे तपशील स्वत:जवळच ठेवले. दीपक हा आराेपी राेहितकडेच राहत हाेता व तिथे आणखी बेराेजगार मुलेदेखील येत हाेती. त्यांच्याकडूनदेखील अशीच कागदपत्रे घेऊन फर्म उघडल्याचे दीपकला कळाले.
 

बेराेजगार युवकाच्या खात्यातून काेटींचे व्यवहार
आराेपी बेराेजगारांच्या नावाने उघडलेल्या फर्म व बॅंक खात्यांच्या माध्यमातून ऑनलाईन बेटिंग, गेमिंग, सट्टेबाजी, अवैध सावकारी, हवाला हे व्यवसाय करत हाेते. आराेपींनी 13 ऑक्टाेबर ते 27 ऑक्टाेबर या कालावधीत एकट्या दीपकच्या खात्यातून 1.73 काेटींचे व्यवहार केले हाेते. त्याच्या तक्रारीवरून राणाप्रतापनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता आंतरराज्यीय टाेळीचा छडा लागला. आराेपींनी आणखी तरुणांचीदेखील अशीच फसवणूक केल्याचे चाैकशीतून समाेर आले. त्या बॅंक खात्यांवरील रकमा गाेठविण्यात आल्या आहेत.
 
 
देशभरात पसरले जाळे
संबंधित बॅंक खात्याशी निगडीत गुन्ह्यांबाबत देशभरात 82 तक्रारींची नाेंद असल्याची माहिती एनसीसीआरपीच्या माहितीतून समाेर आली. त्यातील एकट्या 13 तक्रारी महाराष्ट्रातील आहेत.आराेपी बेकायदेशीर कृत्यांतील पैशांतून बीएमडब्लू कार घेऊन िफरत हाेते. त्यांच्याकडून ती कार तसेच 8 आस्थापना नाेंदणी प्रमाणपत्रे, 9 किराया पत्रे, रबरी शिक्के, बॅनर्स, विविध आधार कार्ड, 58 चेक बुक्स, 50 सीमकार्ड्स, 38 स्मार्टाेन्स जप्त करण्यात आले आहेत. पाेलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सचिन मते यांनी ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0