नागपुरात पाेलिस यंत्रणा सतर्क, झाडाझडती सुरू

12 Nov 2025 11:20:17
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur police नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ साेमवारी सायंकाळी झालेल्या भीषण बाॅम्बस्फोटानंतर उपराजधानीत पाेलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. नागपूर पाेलिसांनी लाॅज, आस्थापना, चारचाकी वाहनांची तपासणी वाढवली आहे. तसेच संवेदनशील भागांमध्ये झाडाझडती सुरू केली आहे. यासाेबतच बाॅम्ब शाेधक-नाशक पथकाकडून सर्व महत्वाच्या वास्तू आणि ठिकाणी कसून तपासणी केली जात आहे.
 
 

nagpur police, security alert, Delhi Red Fort blast 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या महालसह रेशिमबागेतील डाॅ. हेडगेवार स्मृती मंदिराकडे येणारे प्रत्येक संशयित वाहन तपासले जात आहे. साेबतच गर्दीची ठिकाणे असलेली रेल्वे, बस स्थानके, विमानतळावरही पाेलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. हद्दीतल्या पाेलिस ठाण्यांमधून अतिरिक्त पाेलिस संवेदनशील ठिकाणी तैनात करण्याच्या सूचना परिमंडळांच्या पाेलिस उपायुक्तांना देण्यात आल्या आहेत.
महाल परिसरातील संशयितांवर करडी नजर ठेवली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाल, रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरातील हाॅटेल, लाॅज, आस्थापनांची पाेलिसांनी तातडीने तपासणी सुरु केली आहे. बाहेरगावाहून येणाèयांसाठी भाड्याने निवास व्यवस्था करून देणाèया प्रतिष्ठानांना पूर्वसूचना न देता आकस्मात भेट देऊन तेथील कागदपत्रांची आणि नाेंदणीची कसून तपासणी केली जात आहे. संवेदनशील असलेल्या प्रतिष्ठानांच्या सुरक्षेसाठी गरज पडल्यास बाॅम्ब शाेध आणि नष्ट पथकालाही सज्ज राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. संवेदशील झाेनमध्ये येणारे प्रत्येक संशयित वाहने कसून तपासले जात आहे.
Powered By Sangraha 9.0