निवृत्तीवेतनधारकांची त्रैमासिक सभा १८ नोव्हेंबरला

12 Nov 2025 19:21:30
नागपूर, 
quarterly-meeting-of-pensioners : मूळ निवृत्तीवेतन धारकांचे मृत्यू पश्चात जे कुटूंब लाभ घेत असतील, अशा कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा वयाचा पुरावा नसल्याने वयाचे ८० वर्षानंतर द्यावयाच्या २० टक्के अतिरितक्त निवृत्तीवेतनाच्या लाभ देणे शक्य होत नाही, अशा कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी वयाचा पुरावा (आधारकार्ड व्यतिरिक्त) त्यांचे पॅन कार्ड,पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वया बाबातचे प्रमाणपत्र जिल्हा कार्यालय नागपूर येथे करण्याचे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
 
 
pension
 
निवृत्ती वेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या अडचणी संबंधाबाबतचे निवारणक व त्यावरील समाधान याबाबत निवृत्तीवेतन धारकांची त्रैमासिक सभेचे आयोजन १८ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ कोषागार कार्यालय यांच्या सभागृहात सकाळी ११ वाजता करण्यात आलेले आहे. या निवृत्तीवेतन धारकांच्या काही अडचणीचे समाधान करण्यात त्याच बरोबर निवृत्तीवेतन धारकांचे दृष्टिने निवृत्तीवेतन वाहिनी या संगणकीय प्रणालीतील उपलब्ध सुविधा या त्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येईल.
 
 
मूळ निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यु पश्चात कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मिळण्यास येत असलेल्या अडचणीबाबत दिलासा देण्यासाठी कोषागाराकडून कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वयाचा पुराव्याबाबत प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन प्रभारी वरिष्ठ अधिकारी मोनाली भोयर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0