तुर्कीचे लष्करी विमान कोसळून 20 सैनिक ठार

12 Nov 2025 21:33:03
इस्तांबूल, 
Turkish military plane crash : अझरबैजान सीमेजवळ जॉर्जिया भागात तुर्कीचे एक लष्करी मालवाहू विमान कोसळले, त्यात क्रू मेंबर्ससह 20 लष्करी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तुर्की आणि जॉर्जियन अधिकाऱ्यांनी मृत्यूची पुष्टी केली आहे.
 
 
plane
 
तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, अझरबैजानहून तुर्कीला परतत असताना लष्कराच्या मालवाहू विमानात तांत्रिक बिघाड झाली आणि ते कोसळले. सी-130 हरक्यूलिस विमान हे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने विकसित केलेले चार इंजिनांनी सुसज्ज असलेले टर्बोप्रॉप लष्करी वाहतूक विमान आहे. ते लहान धावपट्ट्यांवरून सहजपणे उड्डाण आणि उतरण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्याचे प्राथमिक कार्य सैन्य आणि उपकरणे वाहतूक करणे आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली. अझरबैजान आणि जॉर्जियन अधिकाèयांनी संयुक्त शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे.
Powered By Sangraha 9.0