नप निवडणुकीत दोन लाखांवर मतदार बजावणार अधिकार

12 Nov 2025 10:04:47
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
gopal deshpande यवतमाळ नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत एकूण 2 लाख 32 हजार 315 मतदार आहे. यात पुरुष 1 लाख 16 हजार 245 तर महिला 1 लाख 16 हजार 46 व इतर 24 मतदार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
 

देशपांडे  
 
 
यावेळी तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, नगर परिषदचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार उपस्थित होते. पुढे बोलताना देशापांडे म्हणाले, निवडणूकीसाठी शहरात एकूण 248 मतदार केंद्र आहेत. त्यात खाजगी इमारती असलेल्या 108 मतदार केंद्र आहे. प्रभागाच्या बाहेरील 32 केंद्र आहे. मतदान केंद्र असलेल्या एकूण 74 इमारती आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची व शेवटीची तारीख सोमवार, 17 नोव्हेंबर दुपारी 3 पर्यंत आहे. 16 नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उमेदवारांनी नामनिर्देशन आभासी पद्धतीने करुन ते उपविभागीय अधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जमा करायचे आहे. नामनिर्देशनपत्रे छाननी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे. तर नामनिर्देशपत्रे मागे घेण्याची प्रक्रिया उपविभागीय अधिकाèयांच्या कार्यालयात होणार आहे.gopal deshpande विधीग्राह्य रितीने नामनिर्दिष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी मंगळवार, 18 नोव्हेंबर सकाळी 11 वाजतापासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोणत्याही उमेदवाराचे अपील नसल्यास मागे घेण्याची शेवटची तारीख बुधवार, 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे. अपिल असल्यास शुक्रवार, 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. तर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी बुधवार, 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0