स्वीडनचा ऐतिहासिक पराक्रम! पहिला कॅशलेस देश बनला!

12 Nov 2025 12:50:41
स्टॉकहोम,
Sweden becomes a cashless country जगातील पहिला १००% डिजिटल पेमेंट असलेला देश म्हणून स्वीडनने इतिहास रचला आहे. युरोपातील या प्रगत देशाने अखेर संपूर्णपणे कॅशलेस अर्थव्यवस्था स्वीकारली असून, आज स्वीडनमध्ये रोख रकमेचा वापर पूर्णपणे थांबला आहे. देशातील प्रत्येक व्यवहार आता डिजिटल माध्यमातूनच केला जातो. दुकाने, रेस्टॉरंट्स, सार्वजनिक सेवा केंद्रे अशा सर्वत्र रोख स्वीकारली जात नाही असे फलक दिसत आहेत.
 
 
sweden digital payment
स्वीडनने काही वर्षांपूर्वीच या दिशेने नियोजन सुरू केले होते आणि आता ते प्रत्यक्षात आणले आहे. या क्रांतीमागे देशातील नावाजलेले मोबाइल पेमेंट अॅप 'स्विश' हे प्रमुख कारण ठरले आहे. २०१२ मध्ये देशातील प्रमुख बँकांनी संयुक्तपणे हे अॅप विकसित केले आणि लाँच केल्यानंतर त्याचा वापर वेगाने वाढला. सध्या स्वीडनमधील सुमारे ८ दशलक्ष नागरिक, म्हणजेच जवळपास ७५ टक्के लोकसंख्या, Swish चा वापर करते.
 
स्वीडनच्या डिजिटल प्रवासात तरुणांइतकाच उत्साही सहभाग वृद्ध नागरिकांचाही राहिला आहे. पूर्वी असे मानले जात होते की वृद्ध पिढी डिजिटल व्यवहारांपासून दूर राहते, पण स्वीडनने ही समज बदलून टाकली आहे. आज देशातील अनेक वृद्ध लोक मोबाइल अॅप्सचा वापर करून सहजपणे ऑनलाइन पेमेंट करत आहेत. २०१० मध्ये स्वीडनमध्ये सुमारे ४० टक्के व्यवहार रोखीने होत होते, परंतु २०२३ पर्यंत हा आकडा १ टक्क्यांपेक्षा कमी झाला. २०२५ मध्ये रोख व्यवहार जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आले. परिणामी, स्वीडन आता अधिकृतपणे १०० टक्के डिजिटल पेमेंट देश म्हणून ओळखला जातो. या ऐतिहासिक बदलामुळे स्वीडनने केवळ तांत्रिक प्रगतीचे नवे उदाहरण घालून दिले नाही, तर जगातील इतर देशांसाठीही डिजिटल अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
Powered By Sangraha 9.0