सावली,
tigers-spotted : तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या उपरी-डोनाळा मार्गावर बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उपरीकडे येणार्या नागरिकांना जंगल परिसरातून तिन वाघ शेतशिवारात जाताना दिसले.
याबाबत कळताच स्थानिक वनरक्षक डांगे, सामदा वणबीटाचे वनरक्षक सोनेकर यांनी पीआरटी चमूने त्या वाघांचा शोध सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी वनविभागाने डोनाळा येथे 30 ते 40 वलकर्मचार्यांची गस्त लावून शुटरच्या मदतीने चार वाघांना जेरबंद केले होते. त्यानंतर तेथील कॅम्प हटविण्यात आले. मात्र लगेच बुधवारी त्याच परिसरातील उपरी-डोनाळा मार्गावर तिन वाघांनी एकत्रित जंगलातून शेतशिवारात प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. सध्यपरिस्थितीत या परिसरात धानपिक कापणीच्या कामाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी, शेतमजूर सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात असतात. त्यामुळे वनविभागाने शेतकर्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.