नागपूर ,
Trimurti Nagar Ring Road त्रिमूर्ती नगर रिंग रोडवरील पाण्याच्या टाकीसमोरील फुटपाथ सध्या अक्षरशः ‘ओपन बार’ बनला आहे. येथील वाइन शॉपमधून दारू घेतलेले काही लोक रोज संध्याकाळी ते रात्रीपर्यंत खुले आम दारू सेवन करत बसतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचा संताप उफाळून आला आहे.मोठ्या झाडांमुळे अंधार असलेल्या या ठिकाणी असामाजिक घटकांचा वावर वाढला आहे. अमेय अपार्टमेंटसह आजूबाजूच्या रहिवाशांना रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांशी आणि मुलींशी अश्लील भाषेत बोलणे, गोंधळ घालणे अशी परिस्थिती येथे रोजच निर्माण होते.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या तरी पोलिसांचे पेट्रोलिंग अत्यंत अपुरे असल्याची खंत व्यक्त केली जाते.Trimurti Nagar Ring Road नागरिकांचे म्हणणे आहे की, “हा भाग मुख्यमंत्री महोदयांच्या मतदारसंघात येतो, त्यामुळे तरी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे.”फुटपाथवरील हा ‘दारूबाजांचा अड्डा’ तातडीने हटवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
सौजन्य: आनंद माथनकर,संपर्क मित्र