मुंबई,
amitabh bachchan meet dharmendra शोले चित्रपटातील जय-विरुची जोडी आठवली की प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची प्रतिमा उभी राहते. सिनेमात दाखवलेल्या मैत्रीच्या घट्ट बंधनाचा अनुभव रिअल लाईफमध्येही दिसतो. याचं उत्तम उदाहरण नुकताच पाहायला मिळालं. धर्मेंद्र यांना नुकताच मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आता त्यांच्यावर त्यांच्या घरी उपचार सुरु आहेत. या काळात अनेक सेलिब्रिटींनी त्यांना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. परंतु याच भेटींमध्ये सर्वात लक्षवेधक ठरलं ते अमिताभ बच्चन यांचं आगमन.
अमिताभ बच्चन कोणताही बॉडीगार्ड सोबत न घेता अगदी साधेपणाने स्वतः गाडी चालवत धर्मेंद्र यांना भेटीसाठी गेले. दुपारी सुमारास बिग बी धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचले आणि त्यांच्या साधेपणा व नम्रतेने उपस्थित सर्वजण चकित झाले. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अमिताभ यांचा बॉडीगार्डशिवाय स्वतः गाडी चालवत येण्याचा हा नजारा चाहत्यांसाठी खास ठरला. या भेटीमुळे शोले सिनेमातील जय-विरुची मैत्री पुन्हा आठवली. धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी या कठीण काळात त्यांची प्रायव्हसी राखण्याचा प्रयत्न केला. अमिताभ बच्चन यांची साधी भेट आणि मित्राच्या काळजीची भावना पाहून चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा शोले सिनेमातील मैत्रीची आठवण ताजी झाली आहे.