वर्धेत शेकोटीवरून वाद ; तिघांनी एकास बदडले

13 Nov 2025 20:33:26
वर्धा, 
argument-over-fire-in-wardha शेकोटीच्या कारणावरून वाद करून तिघांनी एकास बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या तारफैल परिसरात १२ रोजी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
 
 
argument-over-fire-in-wardha
 
तारफैल हा परिसर वर्धा शहरातील अतिसंवेदनशीन परिसरापैकी एक परिसर आहे. याच परिसरात १२ रोजी रात्री उशीरा तिघांनी एका व्यक्तीस शेकोटीच्या कारणावरून वाद करून बेदम मारहाण केली. argument-over-fire-in-wardha संबंधित प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाय गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या काही तासांत तीन पैकी एका आरोपीस अटकही केली आहे. तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. संबंधित प्रकरणी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष टाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नसल्याने जखमी व आरोपींची नावे कळू शकली नाही.
Powered By Sangraha 9.0