अल्पवयीन मुलीवर सशस्त्र हल्ला

13 Nov 2025 20:38:07
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
armed-attack-on-minor-girl : उमरखेड शहरात अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी छेडछाडीचा प्रयत्न करत शारीरिक मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
 
 
y13Nov-Mulagi
 
 
 
12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सुमारे 6.45 वाजता खडकपुरा परिसरात ही घटना घडली. तक्रारदार ही स्थानिक शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी असून ती कपडे प्रेस करण्यासाठी आरोपी ज्ञानेश्वर मोकळे यांच्या दुकानात जात असे. या दरम्यान आरोपी ज्ञानेश्वर विश्वनाथ मोकळे (20, महात्मा फुले वार्ड), शेख जाहीद शेख मुक्तार (23, काझीपूरा वार्ड) व सय्यद जैयद अली (22, जामा मस्जिद वार्ड) या तिघांनी तिच्याशी बोलण्याचा व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
 
 
अल्पवयीन मुलीने हा त्रास वडिलांना सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी आरोपींच्या पालकांना मुलांना समज देण्यास सांगितले. याचा राग धरून दुसèयाच दिवशी आरोपींनी दुकानाजवळ येऊन मोटारसायकलवरून मुलीच्या अंगावर झेप घेत तिच्या पोटावर व दंडावर सशस्त्र हल्ला केला.
 
 
या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 78 (1)(ळ), 118 (1), 333, 3 (5), तसेच पोक्सो कायद्याखालील कलम 12 आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
 
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरू असून पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना 13 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.54 वाजता अटक केली आहे. घटनेनंतर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0