बिरसा मुंडा जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

13 Nov 2025 20:13:00
नागपूर,
birsa-munda-jayanti : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा संकुल, मानकापूर येथे राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी, माया इवनाते, विष्णू चांगदे आदी उपस्थित होते.
 
 
 
birsa
 
 
 
जनजातीय गौरव वर्ष अंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन १५, नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता जिल्हा क्रीडा संकुल, मानकापूर येथे होईल. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
 
जनजातीय गौरव वर्षाअंतर्गत चेतना परिषदेचे आयोजन १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले असून धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान केंद्रीय जनजातीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, राज्यसभा खासदार सुमेर सिंह सोलंकी, सामाजिक कार्यकर्ते चेतराम पवार, जनजातीय कार्य मंत्रालयाचे संचालक दिपाली मासिरकर आदी उपस्थित राहतील.
 
 
जिल्हा क्रीडा संकुल मानकापूर, येथे १७ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण कार्यक्रम व युवक युवती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री जुएल ओराम, कुवर विजय शाह, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, मध्यप्रदेशचे मंत्री संपतिया उईके, माजी महापौर मायाताई ईवनाते, मंत्री अशोक उईके, खा.फग्गनसिंह कुलस्ते आदी उपस्थित राहतील.
Powered By Sangraha 9.0