वाशीम,
Control over illegal traffic वाशीम जिल्ह्यातील बेकायदेशीवर वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे व नियंत्रित करणेकरीता वाशीम जिल्हा पोलिस दलात दोन इंटरसेप्टर वाहने दाखल झाली आहे. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी विशेष पुढाकार घेतला. वाशीम जिल्ह्यात जे वाहन धारक बेकायदेशिरपणे तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करुन अतीवेगाने वाहन चालवतील, विना हेल्मेट, ट्रिपलसीट दुचाकी चालविारे तसेच सिट बेल्टविना चारचाकी वाहन चालवत असणारे वाहन चालक असे विविध प्रकारचे नियत्रांचे उल्लंघन करणार्या बेशिस्त वाहनचालकांवर दोन इंटरसेप्टर वाहनाद्वारे कडक नजर ठेवून वाहनामधील अॅटोमेटीक कॅमेराद्वारे कारवाई करणार्या येणार असून, सदर वाहनचालक दंडास पात्र राहतील.
यातील एक वाहन महामार्ग पोलिस केंद्र अमानी तर दुसरे वाहन जिल्हा पोलिस वाहतूक नियंत्रण शाखा वाशीम येथे कारवाई करणेकरीता देण्यात आली आहे. सदर वाहनातील अॅटोमेटीक कॅमेरदाद्वारे होणार्या कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदेशिर वाहन चालकांवर आळा बसणार आहे.