वर्धा,
date-sansthas-bhole-sumanth येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी दीपक गायकवाड (पुणे), प्रा. वृषाली मगदूम (वाशी-मुंबई), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे) यांची तर जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ संशोधक, विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व यशवंतराव दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली.

डॉ. यशवंत सुमंत कुटुंबीयांच्या वतीने सहा वर्षांपासून ज्येष्ठ अभ्यासकांसाठी जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. यावर्षीच्या सहाव्या पुरस्कारासाठी विचारशलाका त्रैमासिक व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांची निवड करण्यात आली आहे. यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल. भोळे कुटुंबीय यांच्या संयुत वतीने देण्यात येणार्या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी दीपक गायकवाड यांच्या ‘पेरियार-मिथक आणि वास्तव’ या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. date-sansthas-bhole-sumanth भोळे कुटुंबीय व दाते संस्थेच्या संयुत वतीने देण्यात येणार्या डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे इतिहास विभागातील प्राध्यापक, संशोधक डॉ. देवकुमार अहिरे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. भा. ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी २० हजार व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी १० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. हाशम शेख, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. चैत्रा रेडकर, विजया भोळे, हिरण्यमय भोळे, माधुरी सुमंत व किशोर बेडकिहाळ आदी मान्यवरांनी काम केले, अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे पुरस्कार समिती प्रमुख संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे व संजय इंगळे तिगावकर यांनी दिली. माधुरी सुमंत, विजया भोळे व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या योगदानाद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे .