देसाईगंज नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का

13 Nov 2025 17:49:36
देसाईगंज,
Desaiganj Municipal Council आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर देसाईगंज (वडसा) येथील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश फाफट यांच्यासह अनेक प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाने देसाईगंज नगरपरिषदेत भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे. हा पक्षप्रवेश 12 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी तथा चिमुरचे आमदार किर्तिकुमार भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली, माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत पार पडला. 
 
 
Desaiganj Municipal Council
 
यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश फाफट, राजू आकरे, अमित जेजानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष अन्नु साधवानी, खुशबू साधवानी, सुधीर साधवानी, आशिष रामानी, ठाकूर परसवानी, विजय मोटवानी, रिजवान खानानी, प्रदीप निरंकारी, रवी डेंगानी, प्रदिप साधवानी, शंकर परसवानी, मुरली मोटवानी, कृपालदास देवानी, हर्ष कुकरेजा, जितू अंदानी, सुधीर रामानी, पंकज केशवाणी, अविनाश मिरगानी, सुरज कुकरेजा, आशिष साधवानी, गौरव परसवानी, विशाल डेंगानी, जैकी मोटवानी, महेश गगनानी, रितिक मोगरे, सहेज साधवानी, जानू डेंगानी, समीर लालानी, प्रणय नागदेवे, आशिष कुकरेजा, प्रशांत मेश्राम, राहुल सतवाणी, आशिष नागदेवे, विवेक डेंगानी, आर्यन मेश्राम, भाविक कुकरेजा, गोविंद साधवानी, नितीन मलंग, कोमल साधवानी, अनुष्का रामानी, रश्मी केशवाणी, दिक्षा सतवाणी, कोमल परसवानी यासह असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.
 
 
 
यावेळी बोलताना आमदार किर्तिकुमार भांगडीया म्हणाले की, आमचे सरकार हे नागरिकांचा विश्‍वास, अपेक्षा आणि समर्थन यावर चालणारे आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील विकास करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. नागरिकांचा विश्‍वास वाढवण्यासाठीच भाजप लोकभिमुख कामे करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या सर्व नेत्यांचा यथोचित सन्मान राखला जाईल आणि त्यांना योग्य संधी दिली जाईल, असे ते म्हणाले. लोकाभिमुख विकास कार्य करण्याकरिता जनता मोठ्या संख्येने भाजपच्या पाठीशी उभी आहे. भाजप हा सामान्य लोकांचा पक्ष असून कार्यकर्ते हा त्याचा कणा आहे, असेही भांगडीया यांनी स्पष्ट केले.
माजी आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी म्हटले की, गणेश फाफट, अमित जेजानी, अन्नु साधवानी, खुशब साधवानी आणि राजु आकरे यांच्या प्रवेशामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीला एक वेगळे वळण मिळाले आहे. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, मोतीलाल कुकरेजा, गौरव भैय्या ब्रम्हपुरी, राजु जेठानी, शहर अध्यक्ष सचिन खरकाटे, आकाश अग्रवाल, नरेश विठ्ठलानी, सचिन वानखेडे यांच्यासह वडसा येथील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0