तभा वृत्तसेवा
कळंब,
forest-department-office : तालुक्यातील सर्व शासकीय मुख्य अधिकाèयांचे कार्यालय कळंब शहरात असताना वनविभागाचेच कार्यालय जोडमोहा येथे का, असा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. वनविभागाच्या माध्यमातून वेगवेगळी कामे चालत असताना व वन्यजीवांचा उपद्रव सगळीकडे वाढला असताना शेतकèयांना आपल्या तक्रारी घेऊन जोडमोहा येथे जावे लागत आहे. कळंबवरून जोडमोहा 15 किमी अंतरावर असून ये-जा करण्यासाठी मोठी अडचण होते. त्यामुळे शेतकèयांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा मन:स्ताप होत आहे.

सर्व शासकीय कामाकरिता जनतेला कळंब येथे यावे लागते. परंतु वनविभागाचे काम करून घेण्याकरिता मात्र जोडमोहा येथे जावे लागत असल्याने मोठा त्रास होतो व सोबतच व येण्याजाण्यात पूर्ण दिवस वाया जात आहे. जनतेच्या होणाèया गैरसोयीची शासन दखल घेणार का आणि जोडमोहा येथे असलेले वनविभागाचे कार्यालय कळंब येथे आणणार का, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील सर्व शासकीय इमारती ज्याप्रमाणे कळंब शहरात आहे. त्याचप्रमाणे वनविभागाचे कार्यालयसुद्धा कळंब शहरात असणे अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक आमदार व आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके याकडे लक्ष देऊन शेतकèयांच्या त्रासाला पूर्णविराम देतील, का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तालुक्यात असलेले आमचे कार्यालय हे खरंच प्रशासकीय दृष्टीने एका बाजूला गेले आहे. आमचे कार्यक्षेत्र हे कळंब शहराभोवताल व कोठा डोंगरखर्डा या भागांमध्ये असल्याने कळंबमध्येच कार्यालय असावे.
- संजय केराम
आरएफओ कळंब