वर्धा जिल्ह्यात देव पाण्यात; वाट एका निरोपाची

13 Nov 2025 19:55:36
प्रफुल्ल व्यास
वर्धा,
wardha-election वर्धा जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी तब्बल साडे आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील एक पार्ट असलेल्या ६ नगर पालिकांसाठी निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रविवार सोडता ५३ तास बाकी असताना महायुती किंवा महाविकास आघाडीतील एकही उमेदवार जाहीर करण्यात आला नसल्याने जवळपास सर्वच उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
 

wardha-election 
 
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, सिंदी रेल्वे आणि हिंगणघाट नगर पालिकेत थेट नगराध्यक्ष व नगरसेवकासाठी निवडणूक होत आहे. महायुतीत सर्वांना वेगवेगळे लढण्याचे संकेत आधीपासुनच असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेने वेगळी तयारी केली तर भारतीय जनता पार्टी सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. तर महाविकास आघाडीने एकत्र लढण्याची तयारी केली आहे. आठ वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांवर भारतीय जनता पार्टीचे राज्य होते. आर्वी येथे तर १०० टके भाजपाचे नगरसेवक निवडून आले होते. wardha-election एक निरोप येईल आणि आपण उमेदवार होऊ अशी अशा उमेदवार लावून बसले आहेत.
 
 
जिल्ह्यात वर्धा ओबीसी राखीव, देवळी सर्व साधारण, आर्वी सर्व साधारण महिला, सिेंदी रेल्वे सर्व साधारण महिला, हिंगणघाट सर्व साधारण महिला तर पुलगाव ओबीसी महिला नगराध्यक्षाकरिता राखीव आहे. त्यामुळे आपल्याच पत्नीला तिकीट कशी मिळेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील बैठकांचे सत्र आटोपत मुंबई, नागपूर येथे सुरू असलेल्या अंतिम फेरीकडे इच्छूक नगराध्यक्ष व नगरसेवकांचे लक्ष लागले आहेे. इच्छूक उमेदवारांनी जनसंपर्काची पहिली फेरी पूर्ण केली आहे. परंतु, आता तिकीट मिळण्यासाठीचे कोणतेही संकेत नसल्याने काहींनी प्रचारात ब्रेक घेतल्याचेही तर काहींनी अतियश आत्मविश्वासात नेत्यांसोबत असलेला घरोबा लक्षात घेता प्रचारात आघाडी घेतली आहे. कालपर्यंत ऑन लाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात निरुत्साह होता. आज अर्ज दाखल करण्याची ओपनिंग झाली. wardha-election भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता उमेदवारी मागणार्‍यांची लांबलचक रांग असल्याने नेत्यांकरिता डोकेदुखी उमेदवार जाहीर करणे डोकेदुखी ठरत आहे. अनेकांनी नगरसेवक ते नगराध्यक्षाकरिता अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. पक्ष श्रेष्ठींकडून काही आश्वासन मिळाल्यानंतर ते उमेदवारी अर्ज मागे घेतल्या जातील हा भाग वेगळा. पण, उमेदवारीच नव्हे तर एबी फॉर्म जोपर्यंत हाती मिळत नाही तोपर्यंत सर्वांनीच देव पाण्यात ठेवले आहेत.
देव दारादारात
वर्धेत नगर पालिकेची उमेदवारी जाहीर व्हायची आहे. त्यापूर्वीच जिल्ह्यात पिपरी (मेघे) जिल्हा परिषदेत भाजपाकडून दिवाळी स्नेहमिलनच्या निमित्ताने अविनाश देव यांनी प्रचाराचा नारळही फोडला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची उपस्थिती होती. देव यांनी आता पिपरी (मेघे) जिप सर्कलमध्ये जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.
Powered By Sangraha 9.0