‘इंद्रधनुष्य–२०२५’ मध्ये मुलींनी मारली बाजी

13 Nov 2025 19:34:44
नागपूर, 
Indradhanushya-2025 : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य–२०२५’ मध्ये महाराष्ट्र प्राणी व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (माफसू) विद्यार्थीनींनी उल्लेखनीय कामगिरी करून विद्यापीठाचा मान उंचावला.
 
 
indradhanushya-2025-(1)
 
 
 
नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या आस्था सोनी हिने मृदाशिल्पन (क्ले मॉडेलिंग) या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला, तर अदिती घुगे, खुशी भोयर, ओजस्वी लबडे आणि आस्था सोनी यांच्या संघाने इंस्टॉलेशन प्रकारात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. राज्यपाल कार्यालयामार्फत दरवर्षी आयोजित या कला महोत्सवात राज्यातील सर्व विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते. यंदाच्या महोत्सवास लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांची उपस्थिती लाभली. माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संचालक शिक्षण डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सचिन बोंडे, तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत कोरडे आणि विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. राजेश लिमसे यांनी विजेत्या विद्यार्थीनींचा सत्कार करून त्यांच्या यशाचे कौतुक केले. या यशामुळे माफसू आणि नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा नावलौकिक वाढला असून, विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या कलात्मक परंपरेला उजाळा दिला आहे.
Powered By Sangraha 9.0