गौरव व मितालीचे दुहेरी यश

13 Nov 2025 21:26:51
नागपूर,
inter-college-athletics : पहिल्या दिवशी स्पर्धा विक्रमासह पंधराशे मीटरची शर्यत जिंकणार्‍या आर्ट्स, कॉमर्स नाईट कॉलेजच्या गौरव खोडतकर आणि चक्रपाणी महाविद्यालयाच्या मिताली भोयरने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या आंतर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पाच हजार मीटरची शर्यत जिंकून दुहेरी यश संपादन केले. महिलांच्या शंभर मीटर हर्डल्स शर्यतीत एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या संयोगिता मिसरने नवीन स्पर्धा विक्रम नोंदविताना तब्बल ३९ वर्षे जुना विक्रम इतिहास जमा केला.
 
 

gourav-khodatkar 
 
 
 
फॉर्मात असलेल्या गौरवला पाच हजार मीटरची शर्यत १५ मिनिटे ००.२३ सेकंदात जिंकली. रौप्यपदक जिंकणार्‍या डॉ. वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालयाच्या निखार भलावीने जवळपास ४५०० मीटरपर्यंत आघाडी कायम ठेवली होती. मात्र, नंतर गौरवने वेग वाढवून शर्यत जिंकली. निखारने रौप्य तर कांस्य पदक जिंकणार्‍या देशमुख महाविद्यालय भारसिंगीच्या रोहित पटलेने १६ मिनीटे ०४.८४ सेकंदात शर्यत पूर्ण केली. महिलांच्या पाच हजार मीटर शर्यतीतही २३ वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्‍या आव्हान नव्हतेच.
 
 
प्रियदर्शनी अभियांत्रिकीच्या भव्यश्री महल्लेने मितालीसोबत सहा फेर्‍यापर्यंत धावताना रौप्यपदक निश्चित केले. खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या भव्यश्रीने १८ मिनीटे ३२.५४ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक पटकाविले. खेलो इंडिया स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर पहिलेच रौप्यपदक होय. काल तिला पंधराशे मीटर शर्यतीत ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. तेजस्विनी लांबकानेने १९ मिनीटे सेकंदात ब्राँझपदक पटकाविले. प्रथमच आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी झालेल्या बिंझाणी महाविद्यालयाच्या संयोगिता मिसरने महिलांच्या १०० मीटर हर्डल्स शर्यतीत झेप घेताना तब्बल ३९ वर्षे जुना विक्रम इतिहास जमा केला. विशेष म्हणजे संयोगिता ही अविनाश पानतावणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिंझाणी कॉलेजच्या मैदानावर सराव करते.
Powered By Sangraha 9.0