प्रकल्प कार्यालयातील चोरीचा तपास सुरू

13 Nov 2025 20:54:31
धारणी, 
theft-at-project-office ३ जून २०२४ च्या रात्री धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कुलूप तोडून अंडा खरेदी फाईल, सोबत नस्ती असलेली केळी पुरवठा फाईल सुद्धा चोरीला गेलेली होती. ही घटना प्रकल्प अधिकारी यानथन यांच्या कार्यकाळातील असली तरी विविध आदिवासी आश्रमशाळांचे डायट रजिस्टर, पोच पावती तथा कार्यालयातील नोंदी तपासणे सुरू असल्याची माहिती विद्यमान प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी दिल्याने ‘अंडा फाईल’ दोन-चार कर्मचार्‍यांचा बळी घेणारच, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
 

theft-at-project-office 
 
धारणी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कपाटात ठेवलेल्या अंडी व केळी खरेदीच्या दोन्ही फाईली विविध व्हावचरांसह नियोजितपणे चोरी झाल्याचे सत्य असून या प्रकरणी वृत्त प्रकाशित होताच प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी आपल्या पद्धतीने अंडा फाईलचे रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याने एकच खळबळ माजलेली आहे. २०२२-२०२४ वर्षातील तब्बल ८७ लाखाचा गैरप्रकार करणार्‍या संशयित कर्मचार्‍यांची बदली मुख्यालयात झाल्याने चोरी मागील षडयंत्र लवकरच उजेडात येण्याची शक्यता आहे. १ सप्टेंबर २०२३ पासून ३१ एप्रिल २०२४ पर्यंतच्या काळात प्रत्यक्षात नाममात्र अंडी पुरवठा करून चाळीसगाव येथील स्वामी समर्थ सप्लायर्स नावाच्या संस्थेच्या अमरावती येथील हस्तकांनी धारणी प्रकल्पातील दोन ते तीन कर्मचार्‍यांना हाताशी धरून बनावट देयके, पोच पावत्या व इतर दस्तऐवज सादर करून तडकाफडकी ८७ लाखांची उचल केली होती. theft-at-project-office आदिवासी आश्रमशाळांची पोचपावती बनावट तयार करण्यात आल्याची गंभीर माहिती आहे. या सोबतच केळी सप्लायर्स संस्थेने पण आपली देयके आवश्यक कागदपत्रांसह दाखल केलेली होती. मात्र, केळी देयकांची प्रक्रिया कशासाठी थांबविली, हे पण गुपित आहे. १९ आदिवासी शासकीय आश्रमशाळांच्या पोचपावत्या व डायट रजिस्टर तपासून चोरी झालेल्या देयकांची व दस्तऐवजांची दुसरी प्रत प्राप्त करणे आवश्यक आहे. कार्यालयातील काही कर्मचार्‍यांनी संबंधितांसोबत संगनमत करून आर्थिक गैरप्रकार व चोरीची योजना केल्याने आदिवासींच्या हिश्याचे अंडे परस्पर लंपास करण्यात आल्याचे निष्पन्न झालेले आहे.
Powered By Sangraha 9.0