जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी ओपनिंग, अध्यक्षासाठी १ तर सदस्यासाठी ३ नामांकन

13 Nov 2025 19:49:53
वर्धा,
local-government-elections जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज गुरुवार १३ रोजी अध्यक्ष पदासाठी १ तर सदस्य पदासाठी ३ नामांकनपत्र दाखल झाले.
 
 
local-government-elections
 
जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी व सिंदी रेल्वे या सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे. local-government-elections गुरुवारी देवळी नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी २ तर हिंगणघाट नगर परिषदेच्या सदस्य पदासाठी १ नामांकनपत्र दाखल झाले. तसेच आर्वी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी १ असे ४ नामांकनपत्र दाखल झाले असल्याची माहिती नगर पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.
 
देवळीत अपक्षांनी केला श्रीगणेशा
देवळी : नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला १० रोजीपासून सुरूवात झाली असली तरी पहिल्या तीन दिवसात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. मात्र, गुरुवार १३ रोजी दोन अपक्ष उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करून निवडणुकीचे अर्ज भरण्याचे खाते उघडले आहे. प्रभाग ६ मधून सागर तपासे (अपक्ष) तसेच प्रभाग ८ मधून दिलीप कारोटकर (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. local-government-elections आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले नसून अपक्षांनीच पुढाकार घेत निवडणूक रंगवण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून, शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शयता आहे. मात्र, येथे गेल्या दोन दिवसात एका रात्रीत तीन नगराध्यक्ष झाले. फटाकेही फुटले आणि आता शेवटी कोण होणार नगराध्यक्ष, याची चर्चाही रंगू लागली आहे.
 
Powered By Sangraha 9.0