नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी

13 Nov 2025 21:17:25
तभा वृत्तसेवा
वणी, 
municipal-council-elections : वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुक 4 वर्षानंतर होत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मतदान 2 डिसेंबरला होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. शहरात एकूण 14 प्रभागांसाठी 62 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली.
 
 
jk
 
वणी शहरात निवडणूकी करीता एकूण 14 प्रभागातून 29 नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 1 ते 13 करीता अ व ब अशा दोन जागा व प्रभाग क्रमांक 14 करीता अ, ब व क अशा तिन जागा आहेत. नप अध्यक्षाची थेट जनतेतून निवडणूक होणार आहे. 49 हजार 571 मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. त्यात पुरुष 24 हजार 607 व 24 हजार 964 महिला मतदारांचा समावेश आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत सुटीचा दिवस वगळून नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे.
 
 
यावेळेस एका प्रभागातील सर्व मतदान केंद्र एकाच इमारतीत ठेवण्यात आले आहे. फक्त तीन प्रभागांत जागेअभावी वेगवेगळ्या इमारतीत मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. गोंधळ टाळण्यासाठी प्रशस्त शाळा इमारती व मोकळ्या जागा मतदानकेंद्र म्हणून निवडण्यात आल्या आहेत. विधानसभेत मतदान केलेले व आता करणार असलेले मतदान केंद्र वेगळे राहू शकते. प्रशासनाकडून घरोघरी जाऊन मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे.
 
 
मतदान केंद्रावर आपले मतदान कुठे आहे हे सांगण्याकरिता प्रशासन कर्मचाèयांची नेमणूक करणार आहे. प्रशासनाकडून राजकीय पक्षाच्या पदाधिकाèयाची बैठक बोलविण्यात आली. त्यात नामनिर्देशनपत्र भरण्यासंबंधी व काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव कुठे आहे ते सर्वांनी व्यवस्थित पाहून घ्यावे. नागरिकांनी उत्साहात, शांततेत आणि निर्भयपणे मतदान करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0