ज्येष्ठांनो आरोग्याची "ABCDE" पाळा – डॉ. गोविंद वर्मा

13 Nov 2025 12:48:41
नागपूर,
Nandanvan Senior Citizens Board जुने नंदनवन ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गोविंद वर्मा यांनी ज्येष्ठांना “ABCDE मंत्र” दिला.ते म्हणाले, “ॲक्टिव्ह रहा,व्यस्त रहा, नियमितपणे काम करा व्यायाम करा आणि सात्विक अन्न घ्या. सकारात्मक रहा .
 
adv
 
 
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ॲड. अविनाश तेलंग यांनी “Contact आणि Connect” हा मंत्र देत ज्येष्ठांना एकटेपणा दूर ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी विनोदी पद्धतीने म्हटले, “कुंडलीतील मंगळ शोधण्यापेक्षा ज्येष्ठ मंडळ जवळ करा, Nandanvan Senior Citizens Board समस्या सुटतील.”या वेळी ५० वर्षे वैवाहिक जीवन पूर्ण करणारे, ९२ व ९४ वर्षांचे अतिज्येष्ठ तसेच ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनायक बुजाडे यांनी, तर आभार प्रदर्शन कमलाकर हटवार यांनी केले.
सौजन्य:ॲड.अविनाश तेलंग ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0