वर्धा ठरणार ‘मॉडेल’ राज्य शासनाचा नज फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार

13 Nov 2025 20:23:45
वर्धा, 
chief-minister-fadnavis वयोमानपरत्वे जवळपास प्रत्येकच व्यक्तीत जरादुरदृष्टी किंवा वृद्धापकाळातील दुरदृष्टी हा आजार उद्भवतो. वर्धा जिल्ह्याला या आजारापासून मुत करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने नज फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. फाऊंडेशनच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी व आजार आढळून आलेल्या व्यक्तींना विनामुल्य चश्मे वितरीत केले जातील. प्रेस्बायोपिया निदान व प्रतिबंधासाठी वर्धेला ‘मॉडेल’ जिल्हा बनविण्यात येणार असून त्याच धर्तीवर पुढे राज्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या भागीदारीमुळे प्रतिबंधात्मक अंधत्व निवारणाला योगदान मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 
chief-minister-fadnavis
 
नज फाऊंडेशनचे शिक्षण, पर्यावरण, उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आहे. chief-minister-fadnavis फाऊंडेशनच्या भागीदारीतून वर्धा जिल्ह्यात प्रेस्बायोपिया निदान आणि चष्मा वितरणाचे एक ‘मॉडेल’ तयार होईल. प्रतिबंधात्मक अंधत्व नियंत्रण हे माझ्या प्राधान्याच्या बाबींपैकी एक उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी फाऊंडेशनचे सहकार्य चांगले योगदान देईल, असे सामंजस्य करारानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वर्धेचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आ. सुमित वानखेडे यांच्या विशेष पुढाकारातून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
नज फाऊंडेशनसोबत भागीदारीतून राज्याला ‘प्रेस्बायोपिया’मुक्त करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी या आजाराचे निदान व चश्मे वाटपाची चौकट निश्चित करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ३ ते ६ महिन्याच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी साधारणपणे ४ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. सन २०२४ साली वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या साधारणपणे १४ लाख होती. त्यातील ग्रामीण लोकसंख्या ६७ टक्के म्हणजे ९ लाख इतकी आहे. ग्रामीण भागात साधारणपणे २ लाख प्रेस्बायोपियाचे रुग्ण असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक नागरिकाची विनामुल्य प्रेस्बायोपियाची तपासणी करुन आजार आढळून आलेल्या रुग्णांना विनामुल्य चश्मे वितरीत केले जातील.
नज फाऊंडेशनच्या भागीदारीतून ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सहकार्याने वर्धा जिल्ह्यातील ३५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रेस्बायोपियाबाबत जनजागृती केली जातील. यासाठी आशा, नेत्र सखींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नेत्रतज्ज्ञ, नेत्र सखी, आशा ग्रामस्तरावरच प्रेस्बायोपिया तपासणी करतील. हा आजार आढळून आलेल्या रुग्णांना त्यांच्या आवश्यक्तेप्रमाणे गावातच चश्मे वाटप करतील. नज फाऊंडेशन उपक्रमासाठी आर्थिक सहाय्य व आवश्यक तेवढे चश्मे तसेच आवश्यक साहित्याचा पुरवठा करतील.
कारंजातून होणार सुरुवात
आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारंजा (घा.) तालुयातून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोहिमेची सुरुवात होणार आहे.
Powered By Sangraha 9.0