निर्मल सोसायटीत कोट्यवधींचा घोटाळा; काय कारवाई केली ?

13 Nov 2025 18:22:40
नागपूर,
nirmal-co-operative-society निर्मल को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावर आतापर्यंत कोणती कारवाई केली? अशी विचारणा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय सहकारी निबंधकांना केली. यासंदर्भात न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी निबंधकांना गुरुवार, १३ नोव्हेंबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत.
 

nirmal-co-operative-society 
 
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी निर्मल सोसायटीमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात २९ जून २०२३ रोजी केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांना पत्र लिहिले आहे. घोटाळ्यामुळे सोसायटी दिवाळखोर येण्याची शक्यता आहे. ठेवीदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल. nirmal-co-operative-society आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी या घोटाळ्यासंदर्भात एमपीआयडी कायद्यातील कलम ३ व ४ यासह इतर संबंधित कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात यावी, वर्तमान कार्यकारी मंडळ बरखास्त करून सोसायटीचे संचालन करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी विनंती पोलीस आयुक्तांनी केंद्रीय निबंधकांना केली आहे. परंतु केंद्रीय निबंधकांनी या पत्राची आतापर्यंत दखल घेतली नाही. त्यामुळे हा आदेश दिला. निर्मल सोसायटीने पोलीस आयुक्तांच्या पत्राविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0