सेवादल नगर मंडळाची रामटेक सहल

13 Nov 2025 17:26:09
नागपूर,
Sevadal Nagar सेवादल नगर,ज्येष्ठ नागरिक मंडळ,रामटेक दर्शन सहल,मराठी न्यूज,तरुण भारत,  सेवादल नगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे १३ नोव्हेंबर रोजी रामटेक दर्शन सहल आयोजित करण्यात आली. सहलीदरम्यान भक्तमंडळींनी गड मंदिरातील प्रभू श्रीराम आणि हनुमानाचे दर्शन घेतले.गडावरून दिसणारा निसर्गरम्य देखावा पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले. त्यानंतर भक्तीधाम येथे देव-देवतांचे दर्शन घेऊन निसर्गाच्या सानिध्यात स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतला. येथे पूर्णब्रह्म अभियानाबाबत सुरेश उरकुडे व विठ्ठलराव घोडे यांनी माहिती दिली, तर योग-साधना विषयावर संध्या लायस्कर, मधुकरराव सोनवणे, बाबा जाधव आणि कोरडे यांनी मार्गदर्शन केले.

56 
 
या सहलीसाठी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांनी विनामूल्य बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांनी डॉ. राजीव मिश्रा यांचे आभार मानले. Sevadal Nagar सहल यशस्वी करण्यासाठी नामदेवराव खाटके, सुरज भानसिंग, प्रवीणराव सुरकर, छोटूजी जगनाडे, साहेबराव सरोदे, जयरामसिंग ठाकूर, रामकृष्ण रायमल, प्रा. अशोक मंदे, माया फंदी, मनोरमा लायस्कर आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0